सातारा जिल्ह्यातील 175 ग्रामसेवकांचे धाबे दणाणले | पुढारी

सातारा जिल्ह्यातील 175 ग्रामसेवकांचे धाबे दणाणले

सातारा, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 175 ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांनी फेरआकारणीची प्रक्रिया विहीत कालावधीत पूर्ण केली नसल्याने तरतुदीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील 175 ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आठ दिवसात खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्रत्येक ग्रामपंचायतींनी दर चार वर्षांनी कराची फेरआकारणी करणे बंधनकारक आहे. सन 2023-24 ते 2026-27 या चार वर्षांसाठी कराची फेरआकारणी करून दि. 1 एप्रिल 2023 पासून प्रत्यक्ष कर आकारणी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. फेरआकारणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आला होता. तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कराची बिले खातेदारांना बजावण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

तपासणीमध्ये नमुना नं 1 ते 33 मधील नोंदवह्या अद्यावत ठेवण्याच्या जबाबदारी असताना तपासणीमध्ये नमुना नं. 8 , 9 व 6 अपुर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. आर्थिक वर्ष सुरू होऊन सहा महिने उलटून गेली तरीही सर्व खातेदारांना कर मागणी बिले बजावण्यात आली नाहीत. पावती पुस्तके प्रमाणीत करण्यात आलेली नाहीत. पंचायत समिती स्तरावरून पावती पुस्तके प्रमाणीत करून घेता कर वसुलीसाठी वापरण्यात आली असल्याने बोगस पावती पुस्तकांच्या आधारे करवसुली करून त्यामध्ये अपहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कराच्या रकमेत अपेक्षीत वाढ झाली नसल्याने ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज करत असताना त्रुटी ठेवल्या असून ग्रामपंचायतीचे अभिलेखे अद्ययावत ठेवण्यामध्ये हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे तुमची एक वेतनवाढ दोन वर्षासाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद का करु नये? याबाबतचा खुलासा गटविकास अधिकार्‍यामार्फत 8 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुलासा समाधानकारक नसल्यास प्रस्तावित कारवाई करण्यात येईल, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी सांगितले.

या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवर कारवाई

1. सातारा तालुक्यातील खेड, जकातवाडी, सैदापूर, बोरगाव, मांडवे, कोडोली, ठोसेघर, नागठाणे, देगाव, संभाजीनगर, लिंब, पेट्री, वर्णे, अतित, काशिळ, धनगरवाडी कोडोली, कोंडवे, वडूथ, म्हसवे, संगममाहूली.

2. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु., देऊर, भाडळे, किन्हई, चिमणगाव, सर्कलवाडी, गोळेवाडी, कुमठे, एकंबे, नागझरी, अपशिंगे, पाडळी स्टेशन, तारगाव, वाठारस्टेशन, वाठार (किरोली)

3. फलटण तालुक्यातील सांगवी, मुरूम, जाधववाडी (फ), तरडगाव, निंभोरे, सुरवडी, आदर्की बु., हिंगणगाव, ढवळ, कोळकी, गोखळी, विडणी, साखरवाडी, पाडेगाव, गिरवी, बरड, आसू, सोमंथळी.

4. खंडाळा तालुक्यातील नायगाव, शिरवळ, केसुर्डी, विंग, भोळी, बावडा, धनगरवाडी, शिंदेवाडी, अंदोरी, अहिरे, खेड बु., भादे, पारगाव, मोर्वे, आसवली.

5. कराड तालुक्यातील हजारमाची, आटके, कोपर्डे हवेली, सैदापूर, उंब्रज, उंडाळे, मुंढे, मसुर, शेणोली, ओंड, काले, रिसवड, घोणशी, घोगाव, रेठरे बु., कार्वे, पाल, गोळेश्वर, वडगाव हवेली, विंग या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Back to top button