सातारा जिल्ह्यातील ‘त्या’ ६ जणांचे दहशतवादी संघटनांशी संबंध: कराडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा दावा | पुढारी

सातारा जिल्ह्यातील 'त्या' ६ जणांचे दहशतवादी संघटनांशी संबंध: कराडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा दावा

कराड : पुढारी वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यातील कराडमधील अल्ताफ शिकलगार, साबीर मुल्ला, साताऱ्यातील सादिक शेख, रमजान कागदी, जमीर शेख या सहा जणांचे दहशतवादी संघटनांशी कनेक्शन असल्याचा संशय आहे. त्यांना त्वरित अटक करून सखोल चौकशी केल्यास काही महिन्यांपूर्वी पाटण तालुक्यातील जंगलामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोट चाचणीचे धागेदोरे समोर येतील, असा खळबळजनक दावा कराड तालुक्यातील सकल हिंदू समाज, हिंदू एकता आंदोलन समितीने आज (दि. १३) पत्रकार परिषदेत केला आहे.

कराडमधील शासकीय विश्रामगृहात कराडचे माजी नगरसेवक विनायक पावसकर, चंद्रकांत जिरंगे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे काकासाहेब जाधव, रुपेश मुळे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व सकल हिंदू समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
पुसेसावळी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर हिंदू एकता आंदोलन समितीचे पदाधिकारी तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांना अटक करण्याची मागणी मागील दोन दिवसांपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विक्रम पावस्कर यांचा पुसेसावळीतील घटनेची काही संबंध नाही. जर विनाकारण विक्रम पावसकर यांच्यावर कारवाई झाली. तर संपूर्ण महाराष्ट्रातील सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सातारा जिल्ह्यात कोणतीही घटना घडली, तरी ते सहा जण प्रत्येक वेळी पुढे असतात. राज्यातील वातावरण दूषित करून दंगल घडवण्याचा त्यांचा डाव आहे. बंदी घातलेल्या देशद्रोही संघटनांची त्यांचे लागेबंधे आहेत. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करावी. सकल हिंदू समाज कधीही देश विघातक कृत्य करत नाही. त्यामुळे आम्ही शांत आहोत, असेही या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button