वाहन होताच पंक्चर; मोहितेकाका हजर

वाहन होताच पंक्चर; मोहितेकाका हजर
Published on
Updated on

सातारा : सातारा शहरात वाहन अचानक पंक्चर झाल्याने अनेकांचे वांदे होतात. या अडल्या नडलेल्या वाहन चालकांसाठी मोहितेकाका (रामचंद्र मोहिते) धावून येत आहेत. त्यांचे जुगाड एमएटी गॅरेजसह पंक्चर झालेली दुचाकी जिथे असेल तिथे जाऊन ते पंक्चर काढून देत आहेत. मोहितेकाकांच्या या अफलातून सेवेचे सातारकरांना मोठे अप्रुप आहे.

अडकून पडलेल्या चालकांचे वाहन जाग्यावरच दुरूस्त करत असल्याने मोहिते काकांचे हे जुगाड एम-80 गॅरेज अडल्या नडल्यांसाठी आधारवड ठरू लागले आहे. माफक दरात मोहितेकाका ही सेवा निस्वार्थपणे देत आहेत. मोहितेकाका म्हणजे रामचंद्र माधवराव मोहिते होय. ते 1980 पासून सातार्‍यात राहतात. ट्रक ड्रायव्हर, क्लिनर, सेंट्रिंग, बांधकाम असे कोणते काम त्यांच्या हातून झाले नाही, असे कधी ऐकिवात नाही. मूळचे कराड तालुक्यातील तळबीड आणि आता महादरे तळे येथे राहत असलेले रामचंद्र मोहिते हे मोहितेकाका म्हणूनच परिचित आहेत. मात्र, लॉकडाऊननंतर त्यांचा चेहरा आणि जुगाड एम – 80 गॅरेज सातारकरांच्या नेहमीच लक्षात राहणार आहे.

कोरोनामध्ये त्यांनी सर्वस्व पणाला लावून आपली सेवा मोफत देऊन एक आदर्श निर्माण केला. या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणार्‍यांकडून त्यांनी एकही रूपया घेतला नाही. मोहितेकाकांची जुगाड एम-80 लक्षवेधी ठरते. पंक्चर अथवा अन्य कोणत्याही दुचाकी दुरूस्तीसाठी ती उपयुक्त ठरली आहे. त्यांनी कल्पकतेून या जुगाड गॅरेजची निर्मिती केली.

त्यांचा मोबाईल क्रमांक बर्‍यापैकी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अडीअडचणीच्या वेळेला दुचाकी पंक्चर झाली तर त्यांच्या मोबाईलवर संपर्क करायचा. ते लगेच

तातडीने वाहन पंक्चर झाले असेल तेथे जावून ते पंक्चर काढून देत आहेत. कमी वेळेत व अडचणीच्या काळात ते धावून येत असल्याने त्यांच्या विधायकतेचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news