सातारा : ‘पुढारी’ शिष्यवृत्ती परीक्षेचा शाळाशाळांमध्ये बोलबाला

सातारा : ‘पुढारी’ शिष्यवृत्ती परीक्षेचा शाळाशाळांमध्ये बोलबाला
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  'पुढारी' टॅलेंट सर्च एक्झाम' या शिष्यवृत्ती परीक्षेचा माहोल वाढला असून जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रांगणात या परीक्षेची जोरदार हवा आहे. शाळा-शाळांमध्ये या उपक्रमाचा बोलबाला असून विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धेत उतरत आहेत. पालकही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे दिवसागणीक स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी खटावच्या पूर्व भागातील मायणी, कलेढोण परिसरात 'पुढारी टॅलेंट सर्च'चा जागर दिसून आला.

दै. 'पुढारी' व गणेश बेकरी नांदणी यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी 2024 मध्ये घेण्यात येणारी ही स्पर्धा उपयुक्त ठरत आहे. 'पुढारी' टॅलेंट सर्च एक्झाम' विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेचे नवे दालन उभे करणारी ठरत आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड व रुची निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेची प्रश्नावली सुरू असून खटाव तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अनंत इंग्लिश स्कूल मायणी, हुतात्मा भगतसिंग मायणी, भारतमाता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मायणी, वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला मायणी, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ कलेढोण, नवमहाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चितळी आदी शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. जानेवारी 2024 मधील तिसरा किंवा चौथ्या रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. परीक्षेचा निकाल फेब—ुवारीमध्ये जाहीर केला जाईल.

सहभागी होण्यासाठी येथे करा संपर्क

सातारा शहर व तालुका, कोरेगाव व खटाव तालुका : 9405207193.
माण, फलटण तालुका : 8805007204.
वाई, जावली, महाबळेश्वर, खंडाळा तालुका : 8805007268.
कराड शहर, तालुका व पाटण तालुका : 9922913664.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news