Udayanraje Bhosale : लै मस्ती आलीय का? खासदार उदयनराजेंचा विरोधकांवर प्रहार | पुढारी

Udayanraje Bhosale : लै मस्ती आलीय का? खासदार उदयनराजेंचा विरोधकांवर प्रहार

सातारा : पुढारी ऑनलाईन

सातारा जिल्हा बँकेवरून दोन्ही राजेंमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. दरम्यान आज (दि.३०) खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता टीका केली आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी १० तारखेपर्यंत अर्ज माघार घ्यावे, असे आवाहन केलं. यावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, त्या संस्थेच्या निवडणुकीला येऊन त्यांनी बोलावे ही संस्था चांगली चालली आहे आणि चालवली आहे, असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. (Udayanraje Bhosale )

यावर उदयनराजेंनी आज पुन्हा शिवेंद्रराजेंवर जोरदार टीका केली आहे. “सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण मी ठरवतो. माझी जिरवण्यासाठी फील्डिंग लावणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे. मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका”, अशी टीका करत पुन्हा एकदा जिल्ह्या बँकेच्या राजकारणावरून निशाणा साधला.

Udayanraje vs Shivendraraje : लै मस्ती आलीये

खासदार उदयनराजे पुढे म्हणाले की, असं का? लै मस्ती आलीये? बघू. तुम्ही इकडचे, तिकडचे बोलवून घ्या लोकांना…आपण टाईट करु, जिरवू. माझी नका जिरवू, मेहेरबानी करा, माझी विनंती आहे.

मी तुमचा कोणाचा दुश्मन नाही, हात जोडून विनंती करतो. बँक शेतकरी सभासदांची आहे, मी त्या गोरगरीब शेतकऱी बांधवांच्या वतीने विनंती करतो, त्यांची जिरवू नका. हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जिरवा”.

खासदार उदयनराजेंना पॅनलमध्ये घेणार का?

खासदार उदयनराजेंना पॅनलमध्ये घेणार का? या प्रश्नावर शिवेंद्रराजे यांना विचारले असता ते म्हणाले. मीच पॅनलमध्ये आहे हे मलाच माहीत नाही. पॅनलचा निर्णय शरद पवार, अजित पवार घेतील त्यांना त्यांनी बोलावं, असे सांगत आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता तो मीच सुरू केला आहे, असे स्टेटमेंट उदयनराजेंकडून येईल अशी टिचकी वाजवत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा बँकेची (Satara District Bank Election ) रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या पारंपरिक गृहनिर्माण मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबत भाजप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेसोबत ना. रामराजे, ना. निकबळकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला.

Back to top button