Santosh Jagtap Murder : संतोष जगतापचा खून दुहेरी हत्याकांडाच्या बदल्यासाठी | पुढारी

Santosh Jagtap Murder : संतोष जगतापचा खून दुहेरी हत्याकांडाच्या बदल्यासाठी

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा

Santosh Jagtap Murder : २०११ मध्ये राहू (ता.दौंड )येथील दुहेरी हत्याकांडांतून बळी गेलेल्या तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी गुंड विष्णू जाधव याच्या संबंधित साथीदारांकडून संतोष जगताप याचा खून घडवून आणल्याचा उलगडा उमेश सोनवणे याच्या अटकेनंतर झाला आहे. सुपारी देऊन मुख्य सूत्रधार उमेश सोनवणे याने जगतापचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०११ मध्ये संतोष जगताप याने तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांचा भरदिवसा गोळ्या घालून खून केला होता.

या खूनाचा बदला घेण्यासाठी खूनात मयत झालेले सोनवणे यांचे बंधू उमेश सोनवणे हा प्रयत्न करीत होता.

संबंधित बातम्या

Santosh Jagtap Murder : सुपारी देऊनही खुनाचा प्रयत्न

यापूर्वी दोनवेळा संतोष जगतापच्या सुपारी देऊन खुनाचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर उमेश सोनवणे याने कुख्यात गुंड आप्पा लोंढे याचा खून केलेला गुंड विष्णू जाधव याच्या संपर्कात येऊन संतोष जगतापचा खून करण्याची बोलणी केली होती.

संतोष जगतापचा खून घडल्यानंतर खूनातील आरोपी पवन मिसाळ व महादेव आदलिंगे यांच्याकडून खूनाचे धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधार उमेश सोनवणे याला अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींना कशा स्वरुपात सुपारी मिळाली यांसंदर्भात उलगडा सुरू आहे.

या खूनातील आरोपी हे गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव यांचे निकटवर्तीय असल्याने पोलीस विष्णू जाधव याचा या प्रकरणातील सहभाग शोधून काढीत आहे.

पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे यश

तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, उमेश सोनवणे हा कानिफनाथ हॉटेल (पिर फाटा ता. शिरूर) येथे येणार आहे.

याबद्दल त्यांनी वरिष्ठ निरीक्षक मोकाशी यांना माहिती दिली. त्यांनी पथकासह तेथे सापळा रचून त्यास अटक करण्याच्या सूचना दिल्या.

यावर पथकासह राजू महानोर तेथे पोहोचले व मिळालेल्या माहितीनुसार उमेश सोनवणे तेथे आला असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, संभाजी देवकर, पोलीस शिपाई बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंखे या पथकाने केली.

Back to top button