सातारा : कस्तुरी क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त जल्लोष | पुढारी

सातारा : कस्तुरी क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त जल्लोष

कराड; पुढारी वृत्तसेवा :  हाऊसफुल्ल हॉल आणि जल्लोषाचा माहौल, जयदीप आणि गौरी सोबत धमाल आणि डान्स अशा उत्साही वातावरणात दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबचा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा झाला. यावेळी कस्तुरी क्लब सभासदांनी आणि त्यांच्या मुलांनी कला कौशल्य दाखवत वेगवेगळी नृत्ये सादर केली. तसेच महिलांनी विविध गेम शोमध्ये भाग घेत बक्षिसे पटकावली. यावेळी झालेल्या गेम शोमध्ये भारती जमदाडे यांचा प्रथम तर श्रद्धा शहा आणि निशा जाधव यांचा द्वितीय आणि तृतीय क्रमांक आला.

या कार्यक्रमाच्या वेळी सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांनी महिलांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेत धमाल केली. त्यांच्याशी गप्पा मारत असताना महिलांनी देखील त्यांना विविध मिश्कील प्रश्न विचारले आणि तेवढीच मिश्कील उत्तरे जयदीप आणि गौरी यांनी दिली.

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब सभासद असलेल्या प्रज्ञा मराठे यांनी सर्व मालिकांची नावे एका कवितेत गुंफून ती कविता जयदीप आणि गौरी यांना ऐकवली. कार्यक्रमाला महिलांनी तुफान गर्दी केली होती. कार्यक्रमात डी ट्रेजर डान्स ग्रुप कराड यांच्या सहभागाने नावीन्यपूर्ण डान्सचे प्रकार पाहता आले. निवेदक अजीम कागदी यांच्या खुमासदार निवेदनाने रंगत आणली. प्रथम येणार्‍या तीनशे महिलांना तनिष फॉर्मिंग ज्वेलरी यांच्याकडून हमखास गिफ्ट कूपन देण्यात आले. हे कुपन सर्वच 300 महिलांनी तनिष फॉर्मिंग ज्वेलरीच्या दुकानात जाऊन हमखास गिफ्ट घेतले.

कार्यक्रमात कलागुणांचे दर्शन घडवणार्‍या सर्व पुढारी कस्तुरी क्लब महिला आणि त्यांच्या मुलांचा पुढारी कस्तुरी क्लब तर्फे गौरव करण्यात आला. त्याचबरोबर माहेर फॉर्मिंग ज्वेलरी यांच्याकडून वनग्राम ज्वेलरीमधील एक गंठण, ठुशी, कर्णफुले आणि अंगठी हे सर्व दागिने असलेले दोन सेट लकी ड्रॉ मधून नाव आलेल्या महिलांना देण्यात आले.

‘कस्तुरी क्लब’च्या नोंदणीसाठी उत्साह

यावेळी पुढारी कस्तुरी क्लब मेंबर नसलेल्या महिला देखील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमामधील धमाल मस्ती पाहून आम्हाला देखील पुढारी कस्तुरी क्लबचे सभासद व्हायचे आहे, असे म्हणत अनेक महिलांनी नवीन वर्षाच्या सभासद नोंदणीबद्दल चौकशी केली व आम्ही नक्की पुढारी कस्तुरी क्लबचा भाग होऊ, असे सांगितले.

Back to top button