सातारा : मायणी येथे साडेदहा किलो गांजा जप्त | पुढारी

सातारा : मायणी येथे साडेदहा किलो गांजा जप्त

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  विक्रीसाठी आणलेला सुमारे साडेदहा किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून एकाला अटक करण्यात आली. जाकीर गुलाम मुजावर (वय 41, रा. सांगोला जि. सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एलसीबी) व वडूज पोलिसांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 6 जुलै रोजी वडूज येथील प्रोबेशनर पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे यांना एकजण मायणी (ता. खटाव) येथील अभयारण्यासमोर अमली पदार्थ गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून संशयिताला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सुमारे साडेदहा किलोग्रॅम वजनाचा गांजा सापडला. बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत 2 लाख 55 हजार 600 रुपये आहे. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन संशयिताला अटक केली.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपाधीक्षक अजय कोकाटे, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष पवार, अमोल माने, रविंद्र भोरे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस आतिश घाडगे, मोहन नाचण, संजय शिर्के, विजय कांबळे, अमित सपकाळ, अनिल खटावकर, राजीव कुंभार, रूद्रायन राऊत, सत्यवान खाडे, शिकलगार, नरळे, दत्तात्रय काळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button