सातारा : दूध भेसळ करणार्‍या टोळीचा पदार्फाश; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

सातारा : दूध भेसळ करणार्‍या टोळीचा पदार्फाश; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा, पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा (एलसीबी) आणि अन्न औषध विभागाने कराड तालुक्यात कारवाई करत दूध भेसळ करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे. शनिवारी तालुक्यातील उंब्रजमध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे व हेळगाव येथील दूध संकलन केंद्रांमध्ये दुधात भेसळ होत असल्याचा संशय एलसीबीच्या टीमला आला होता. त्यामुळे या संकलन केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून एक पथक यावर वॉच ठेवून होते. संकलन केंद्रावर भेसळ होत असल्याचे निश्चित झाल्यानंतर शनिवारी दुपारी एकाच वेळी छापा टाकला. छापा पडल्यानंतर सर्वच केंद्रांवर एकच खळबळ उडाली.

या कारवाईत पोलिसांनी संशयितांकडून वाहने, हजारो लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले. याप्रकरणी 9 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अन्न औषधचे अधिकारी माहिती घेत होते. या दुधाचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

Back to top button