सातारा जिल्ह्यात 41 गुरुजींना मिळाली शाळा

सातारा जिल्ह्यात 41 गुरुजींना मिळाली शाळा

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात नुकतीच आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये जिल्ह्यात 130 शिक्षक दाखल झाले होते. यामधील 41 गुरुजींना समानीकरणाने शाळा दिल्या होत्या. मात्र, याबाबत आदेश नव्हते. शुक्रवारी या गुरुजींना शाळा देण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून काढण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मे महिन्यात आंतरजिल्हा बदलीने सुमारे 130 शिक्षक दाखल झाले होते. त्यापैकी 41 शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी समानीकरणाने शाळा दिल्या होत्या. या शिक्षकांना शुक्रवारी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत बदली आदेश देण्यात आले आहे. शाळेवर हजर राहून त्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठवण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकार्‍यांना दिल्या असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली. दरम्यान, आंतरजिल्हा बदलीने आलेले सुमारे 89 शिक्षक अद्यापही पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news