मुख्यमंत्री शिंदे अचानक साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावात हेलिकॉप्टरने दाखल | पुढारी

मुख्यमंत्री शिंदे अचानक साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावात हेलिकॉप्टरने दाखल

पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरेगाव पोहोचल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. अचानक मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोयना विभागातील मुळगाव दरी येथे हेलिपॅड वर आल्यानंतर अचानक प्रोटोकॉलसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.

आज (दि. २१) दुपारी २ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात असणाऱ्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरले. त्यानंतर नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी कोल्हापूरची पोलीस अधिकारी साताराचे पोलीस अधीक्षक समीर शेख त तहसीलदार व उपस्थित असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले मुख्यमंत्र्यांचा अचानक दौऱ्याचे नेमकं कारण काय याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. मात्र नेहमीच लवा जमा घेऊन येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी अचानक जिल्हा दौऱ्यावर आल्याने हा दौरा नेमका कशासाठी आहे, नेमकं या दौऱ्या पाठीमागचं कारण काय, याबाबत अद्यप कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र राज्यभरात राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना मुख्यमंत्र्यांचा अचानक सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दौरा याबाबत अनेक राजकीय तर्क वितर्क मांडले जात आहेत.

हेही वाचा

Back to top button