सातारा : लोणंदकरांनी दिला भक्तीमय वातावरणात माऊलींना निरोप

लोणंद
लोणंद
Published on: 
Updated on: 

लोणंद (जि. सातारा) : पुढारी वृतसेवा – माऊलींच्या पालखी सोहळ्याला भक्तीमय वातावरणात लोणंदकर नागरिकांनी निरोप दिला. लोणंद येथील अडीच दिवसाचा मुक्काम आटोपून आज दुपारी १ च्या सुमारास तरडगावकडे मार्गस्थ झाला. माऊलीला निरोप देताना ग्रामस्थांनी माऊलींच्या रथावर पुष्पवृष्टी केली.

रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या इमारतीवरून नागरिक रथावर पुष्पवृष्टी करत होते. अत्यंत भक्तीपूर्ण व भावपूर्ण वातावरणात माऊलीचा पालखी सोहळा गांधी चौक, शास्त्री चौक, स्टेशन चौक मार्गे फलटण पुलावरून मार्गस्थ झाला. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या जयघोषाने आणी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात लोणंदनगरी डुंबून गेली होती. अडीच दिवसाच्या कालावधीत माऊलीच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा शेवटपर्यंत सुरू होत्या. भाविकांचा महापूर शेवटपर्यंत तसाच सुरू होता. माऊलीच्या पालखी सोहळ्याला लोणंदकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news