सातारा : पिस्तुलाच्या धाकाने खंडणी मागणारी टोळी जेरबंद

सातारा : पिस्तुलाच्या धाकाने खंडणी मागणारी टोळी जेरबंद

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  मेणवली (ता. वाई) येथे हॉटेल व्यावसायिकास पिस्तुलाचा धाक दाखवून 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन दरोडा टाकणार्‍या टोळीस स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व भुईज पोलिसांनी जेरबंद केले. वाई, भुईंज आणि पुण्यातून 11 जणांना अटक केली आहे. 1 जून रोजी दरोड्याची घटना घडली होती.

अनिकेत ऊर्फ बंटी जाधव, आरिफ सिकंदर मुल्ला, सागर तुकाराम मोरे, अभिमन्यू शामराव निंबाळकर, सूरज मुन्ना शेख, संदीप सुरेश पवार,क्षितीज उर्फ सोन्या विरसेन जाधव, गिरीष दिलीप गवळी, प्रज्वल बाळकृष्ण पवार, प्रतीक प्रकाश सूर्यवंशी, रत्नाकर मधुकर क्षीरसागर व निलेश उमेश मोरे ( सर्व रा. भुईंज, ता. वाई), अभिजीत शिवाजी मोरे, निखिल शिवाजी मोरे (रा. गंगापूरी, ता. वाई), अमोल महामुलकर (रा. महामुलकरवाडी, ता. वाई) यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. यातील 11 जणांना अटक करण्यात आली असून तिघे जण कळंबा जेलमध्ये आहेत. तर एकाचा शोध सुरू आहे.

logo
Pudhari News
pudhari.news