माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याचे नियोजन : राधाकृष्ण विखे-पाटील | पुढारी

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना सर्व सुविधा देण्याचे नियोजन : राधाकृष्ण विखे-पाटील

सातारा : पुढारी वृत्तसेवा – माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना यावर्षी प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वारी होत आहे त्या अनुषंगाने वारकऱ्यांना सर्व सुविधा कशा प्रकारे देता येतील याचे नियोजन केले जात आहे. माऊलींच्या सोहळयासाठी सरकारच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जे काम राहिले आहे ती पूर्ण करून घेण्यात येत आहे, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पालखी मार्ग व मुक्काम ठिकाण आदींची पाहणी करताना लोणंद येथील पालखी तळावर राधाकृष्ण विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते .

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील विश्वस्त योगेश देसाई, प्रांत राजेंद्रकुमार जाधव, पोलीस उपाधीक्षक राहुल धस, तहसीलदार चेतन मोरे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके पाटील, मुख्य मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, बीडिओ अनिल कुमार वाघमारे, सपोनी विशाल वायकर आदी मान्यवर उपस्थित होते .

लोणंद पालखी तळाची पाहणी करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालखीतळावर असलेल्या विजेचे पोल व डीपी त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या. पालखी तळावर वारकऱ्यांना पाणी वीज आरोग्य सुरक्षा आदींची कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विखे पाटील यांच्या हस्ते पालखीतळावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेवक रवींद्र क्षीरसागर भरत बोडरे, तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, गणीभाई कच्छी, संदीप शेळके, राहुल घाडगे, श्रीकांत इटलोड आदी उपस्थित होते.

Back to top button