सातारा ; महामार्गालगत गोटे मुंढे गावच्या हद्दीत टायर गोडाऊनला आग

टायर गोडाऊनला आग
टायर गोडाऊनला आग

कराड : पुढारी वृत्तसेवा पुणे-बंगळूर महामार्गावर जुने टायर (स्क्रॅप) गोडावूनला काल (गुरूवार) रात्री उशिरा 11 वाजता भीषण आग लागली. अग्निशमाक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

या विषयी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराडजवळ पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे- मुंढे गावच्या हद्दीत हॉटेल फर्नपासून काही अंतरावर अचानक आग लागली. आगीचे मोठ-मोठे लोट निर्माण झाल्याने काही क्षणातच महामार्गावरील वाहतूक खोळंबली.

घटनास्थळावरील काही लोकांनी अग्निशामक दलाच्या गाड्यांना फोन केला. यावेळी कराड नगरपालिका व कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्याचबरोबर कराड शहर पोलीस कर्मचारीही दाखल झाले होते. आगीमुळे विद्युत वाहक तारा जळून परिसरातील वीज पुरवठा काही वेळ ठप्प झाला होता. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news