ज्या पक्षाच्या जागा जास्त, त्याचा मुख्यमंत्री : पृथ्वीराज चव्हाण

ज्या पक्षाच्या जागा जास्त, त्याचा मुख्यमंत्री : पृथ्वीराज चव्हाण
Published on: 
Updated on: 

कराड, पुढारी वृत्तसेवा : पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार विजयी होतील; अर्थात ज्या पक्षाच्या जागा जास्त, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. कराड बाजार समिती निवडणूक निकालानंतर ते कर्नाटकला प्रचारासाठी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी, त्यांनी कराडमध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? हे आताच सांगता येणार नाही. आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील,

त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल असे सांगत, जर वंचित बहुजन आघाडीचे जास्त आमदार विजयी झाले, तर त्या पक्षाचाही मुख्यमंत्री होऊ शकतो, असेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील बाजार समित्यांचे निकाल पाहिल्यानंतर जनतेच्या मनात काय आहे? हे सहजपणे लक्षात येते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल, असा विश्वासही आ. चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news