मुनावळे जलपर्यटनास मिळणार 53 कोटी

राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद : आ. शिवेंद्रराजेंच्या पाठपुराव्याला यश
53 crores will be received for Munawale water tourism
मुनावळे जलपर्यटनास मिळणार 53 कोटीPUdhari Photo
Published on
Updated on

सातारा, पुढारी वृत्तसेवा : मुनावळे (ता. जावली) येथील कोयना जलपर्यटनासाठी राज्य शासनाने पुरवणी अर्थसंकल्पात 53 कोटी 22 लाखांची तरतूद केली आहे. या पर्यटन प्रकल्पाचे काम सुरू झाले असून निधी उपलब्ध होणार असल्याने प्रकल्पाला गती मिळणार आहे.जावली तसेच सातारा तालुक्याचा पश्चिम भाग निसर्गराजीने नटला आहे. कोयना बॅकवॉटरवर जलपर्यटन प्रकल्पाची उभारणी केल्यास पर्यटनास वाव मिळू शकतो हे ओळखून गोड्या पाण्यातील देशातील सर्वात मोठा जलपर्यटन प्रकल्प मुनावळे (ता. जावली) याठिकाणी उभारण्यात येत आहे.

सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाची माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना आ. शिवेंद्रराजे भोसले व तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली होती. त्यांच्यासमोर या पर्यटन प्रकल्पाचे दोनवर्षांपूर्वी सादरीकरण झाले होते. त्यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला होता. या प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचेही प्रयत्न महत्त्वाचे ठरले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचीही या प्रकल्पासाठी मदत झाली.

53 crores will be received for Munawale water tourism
सातारा : राजवाड्यालगतचे 23 हातगाडे हटवले

मुनावळे जलपर्यटनासाठी राज्य शासनाने पुरवणी अर्थसंकल्पात नुकतीच 53 कोटी 22 लाखांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून हा जलपर्यटन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम गेल्यावर्षी सुरू झाले. या प्रकल्पात पर्यटकांना विविध प्रकारच्या बोटी चालवण्याचा व त्यामधून कोयना जलाशयात विहार करण्याचा आनंद घेता येणार आहे. साहसी पर्यटनाचा थरारक अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे.

सर्वसामान्य पर्यटकापासून श्रीमंत पर्यटकापर्यंत सर्वांचाच विचारकेलेला हा आगळावेगळा पर्यटन प्रकल्प आहे. देशभरात जलपर्यटनांचा अभ्यास करून अत्यंत विचारपूर्वक बनवलेल्या या पर्यटन प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाली आहे. त्यामुळे हा निधी आता उपलब्ध होणार आहे. पर्यटनासाठी मूलभूत पायाभूत सुविधाही दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिकांसह जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सातारा तसेच जावली तालुक्याच्या विकासात मोठी भर घालणारा हा प्रकल्प वर्षभरात पूर्णत्वास नेला जाणार आहे.

53 crores will be received for Munawale water tourism
कागल-सातारा सहापदरीकरणाचा खेळखंडोबा!
या प्रकल्पामुळे पर्यटन वाढणार असून व्यवसाय व रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. तसेच या प्रकल्पामध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले असून त्यांनाच या प्रकल्पावर रोजगार दिला जाणार आहे. त्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षणही स्थानिकांना दिले जात आहे. हे जल पर्यटन केंद्र म्हणजे आपण एखाद्या वेगळ्याच देशात आलो आहोत, असा नावीन्यपूर्ण अनुभव पर्यटकांना येणार आहे. हा महत्त्वाकांक्षी आणि जिव्हाळ्याचा प्रकल्प उभा राहिला आणि याठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करता आला, याचे मला समाधान आहे.
- आ. शिवेंद्रराजे भोसले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news