दोन पुलांसाठी 1.60 कोटी रुपये मंजूर : खा. उदयनराजे भोसले | पुढारी

दोन पुलांसाठी 1.60 कोटी रुपये मंजूर : खा. उदयनराजे भोसले

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरातील पश्चिम भागातील दक्षिणोत्तर लांबीचा महत्वाचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनंत इंग्लीश स्कूल ते गेंडामाळ नाका या रस्त्यावरील बदामी विहिरीजवळील पुलाचे आणि अर्कशाळेच्या पिछाडीस असणार्‍या पुलांच्या रुंदीकरणासाठी सातारा जिल्हा नियोजनमधून 1 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधीदेखील प्राप्त झाला आहे. या दोन महत्वाच्या पुलांच्या रुंदीकरणाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारा शहरातील पश्चिम भागातील दक्षिणोत्तर लांबीचा अनंत इंग्लीश स्कूल ते गेंडामाळ नाका या एक प्रमुख रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावरील बदामी विहिरीजवळील आणि अर्कशाळा पिछाडीस असलेल्या अस्तित्वातील अरुंद पुलाचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेवून माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी या दोन्ही पुलांच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव नियोजन समितीला नगरपरिषदेमार्फत सादर केले होते. नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्याबाबत आम्ही तसेच किशोर शिंदे यांनी पाठपुरावा केला. तसेच पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी तसेच सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट आणि स्थापत्य अभियंता अनंत प्रभुणे यांचे सहकार्य मिळाले.

या दोन पुलांच्या रुंदीकरणासह नवीन बांधकामासाठी एकूण 1 कोटी 60 लाख रुपयांचा भरीव निधी नियोजन समितीमधून मंजूर करण्यात येवून, सदरचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग देखिल करण्यात आला आहे. दरम्यान, या भागातील रहिवाशी यांनी या दोन महत्वाच्या पुलांच्या रुंदीकरणासह नवीन बांधकाम करण्याचे प्रस्ताव नियोजन समितीमधून मंजूर करुन घेतल्याबददल खा. उदयनराजे भोसले, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे आणि संपूर्ण सातारा विकास आघाडीचे आभार व्यक्त करुन अभिनंदन केले आहे.

MP Udayanaraje Bhosale

Back to top button