आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले वाढदिवस विशेष : राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व देणारे नेते | पुढारी

आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले वाढदिवस विशेष : राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व देणारे नेते

मेडिकल कॉलेज, हद्दवाढ, बोंडारवाडी धरणांना मंजुरी

राजकारणापेक्षा सातारा- जावली मतदारसंघाच्या विकासाला कायम प्राधान्य देणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहराची हद्दवाढ, जावली तालुक्यातील महत्त्वाकांक्षी बोंडारवाडी धरण आणि सातारा जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले मेडिकल कॉलेज ही विकासकामे मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले होते. हे तीनही प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती.

सकारात्मक पाठपुराव्यामुळे मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून आणि राज्याचे त्यावेळचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या सहकार्याने सातारा मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. कॉलेजसाठीच्या ६२ एकर जागेचा प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे सुटला आणि कॉलेजसाठी ४९५ कोटी रुपये निधी मंजूर झाला. दरम्यान, कॉलेजसाठी मंजूर असलेल्या जागेवर भव्य इमारत बांधली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया त्वरित व्हावी आणि मेडिकल कॉलेज सुरु व्हावे, त्यासाठीची पदनिश्चिती आणि पदनिर्मिती करावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली होती. या दोन्ही मागण्या मान्य झाल्या. 100 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि 500 खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण 495 कोटी 46 लाख एवढ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

गरजूंना मदतीचा हात

मतदारसंघात चौफेर विकास साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी समाजकार्याचा अनोखा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत जावली तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीच्या मयत झालेल्यांच्या वारसांना शासकीय मदत मिळवून दिली. ज्यांची घरे बाधित झाली त्यांना निवारा, अन्नधान्य दिले. सुमारे 25 गावातील शेतजमीन बाधित झाली होती. शेतजमीन दुरुस्ती मोहीम हाती घेऊन शेतकर्‍यांच्या जमिनी दुरुस्त करून दिल्या. धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

जनहिताचे निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करणारे नेतृत्व अशी ख्याती आ. शिवेंद्रसिंहराजे यांची आहे. सातारा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामाच्या रुपाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे विचार पोहचले असून आ. शिवेंद्रसिंहराजे हे जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

सातारा आणि जावली तालुक्यातील प्रत्येक गावात डांबरी रस्ता, वीज, समाजमंदिर, अंगणवाडी, शाळा इमारत, पाणीपुरवठा योजना असा चौफेर विकास झाला आहे. जनसामान्य थेट आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे येवू लागल्याने आपोआपच ऋणानुबंध वाढत गेला आणि आ. शिवेंद्रसिंहराजे हे आपल्या घरातीलच एक सदस्य आहेत अशी भावना जनसामान्यांमध्ये वाढीस लागली. आ. शिवेंद्रसिंहराजे मतदारसंघातील जनतेच्या सुख- दुख:त नेहमीच सहभागी होत असतात. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे आणि जनता यांचे घनिष्ठ नाते निर्माण झाले आहे.

खरा कोरोना योद्धा

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला होता. सातारा जिल्ह्यातही कोरोनाचे थैमान सुरु होते. पहिल्या लॉकडाऊनपासूनच आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करुन जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. सातारा जावली मतदारसंघातील प्रत्येक वाडी, वस्तीवर अन्नधान्य पोहचवून भुकेल्या पोटांना आधार दिला होता. लॉकडाऊन शिथील होत असताना विविध प्रकारची दुकाने उघडण्यासाठी आणि दैनंदीन व्यवहार सुरळीत होण्यासाठीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.

रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि कुटुंबीयांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने 82 बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारले होते. खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णसेवा उपलब्ध करुन दिली. हे सेंटर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी खासगी हॉस्पिटलला शासनाप्रमाणेच विनामुल्य चालवण्यासाठी दिले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेवरुन प्रशासनाने मेढा ग्रामीण रुग्णालयात 30 बेडचे कोव्हीड केअर सेंटर सुरु केले होते. या सेंटरसाठी डिजीटल एक्सरे मशीन घेण्यासाठी प्रशासनानकडे निधी उपलब्ध नव्हता. ही बाब समजताच त्यांनी डिजीटल एक्सरे मशीन मेढा रुग्णालयास भेट दिले.  कोरोना काळात आ. शिवेंद्रसिंहराजे पायाला भिंगरी लावून सातारा- जावली मतदारसंघात जनतेच्या रक्षणासाठी धावले होते.

विकास कामांच्या झंझावातामुळे सातार्‍याप्रमाणेच जावलीतील कार्यकर्ते आणि सामान्य जनता आ. शिवेंद्रसिंहराजेंसोबत जोडली गेली आहे. सातार्‍यासह जावलीतील प्रत्येक गावात मुलभूत सोयी- सुविधा पुरवून, विकासापासून वंचित राहिलेल्या जनतेला त्यांनी प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतीही तडजोड न करता जनतेचे प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा- जावली मतदारसंघाचा कायापालट केला आहे. म्हणूनच जिल्हाभरातून विविध समस्या सोडविण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या जनसंपर्क कार्यालयात दररोज गर्दी पाहायला मिळते.

एखादी विकास योजना असो किंवा कार्यकर्त्याचे काम असो, ते अगदी जोमाने आणि तडफेने मार्गी लागल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही, हे मी जवळून पाहिले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्याचा सुंगध चंदनाप्रमाणे  सातारा- जावली मतदारसंघात दरवळत आहे. समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणार्‍या बाबाराजेंनी प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव आणि आपुलकी यातून लोककल्याणाचा वसा कायम जोपासला आहे. त्यांना वाढदिनी लक्ष लक्ष शुभेच्छा!

– राजू भोसले (भैय्या)

Back to top button