सातारा : ऑईल टँकर देण्याच्या बहाण्याने १७.६४ लाखांची फसवणूक | पुढारी

सातारा : ऑईल टँकर देण्याच्या बहाण्याने १७.६४ लाखांची फसवणूक

सातारा; पुढारी वृत्तसेवा : ऑईलचा टँकर देण्याच्या बहाण्याने तब्बल 17 लाख 64 हजार 560 रुपयांची एमआयडीसीतील एका व्यवसायाची फसवणूक झाली आहे. ही घटना दि. 13 मार्च ते दि. 23 मार्च या कालावधीत घडली असून, सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी युवराज किसन कांबळे (रा. मुंबई), अल्लाबक्षी फखरुसाब चपाती (पत्ता माहित नाही) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ट्रेडिंग कंपनीचे व्यावसायिक नीलेश मधुकर पवार (वय 47, रा. आशीर्वाद कॉलनी, देगाव रस्ता, एमआयडीसी, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, संशयित आरोपींनी ऑईलचा टँकर देतो, असे सांगून मोकळ्या आईल टँकरची व त्यानंतर भरलेल्या ऑईल टँकरची खोटी बनावट पावती व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवली. त्यानंतर 17 लाख 64,560 रुपये खात्यावर घेवून ऑईलचा टँकर न पाठवताच फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे तपास करत आहेत.

Back to top button