गुढीपाडव्याच्या अपूर्व उत्साहाला उधाण | पुढारी

गुढीपाडव्याच्या अपूर्व उत्साहाला उधाण

सातारा, पुढारी वृत्तसेवा : गुढीपाढव्याचा सर्वत्र अपूर्व उत्साह असून उत्सवाचे जल्लोषी वातवरण आहे. नववर्षाच्या प्रारंभीच अनेक नवनव्या उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत अपार उत्साह आहे. वाहने, सोने-चांदी, स्थावर मालमत्ता, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे. खरेदीसाठी अनेक कंपन्या व विक्रेत्यांकडून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुण-तरुणींनी जय्यत तयारी केली असून पारंपरिक पेहरावात निघणारी नववर्ष स्वागत मिरवणूक आकर्षण ठरणार आहे.

बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी गर्दी होती. चिवे, साखरेच्या माळा, चाफा व कडूलिंबाच्या माळा, फुले खरेदीला झालेल्या गर्दीने मध्यवर्ती भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यंदाचा उत्साह तुलनेत अधिक आहे. बाजारपेठेत झालेल्या गर्दीवरून पाडव्याच्या मुहूर्तावर मोठी उलाढाल होईल, असा व्यापारी बांधवांचा अंदाज आहे.

मुहूर्तावर वाहने नेण्यासाठी अनेकांनी आधीपासूनच बुकिंग केले असून चारचाकी व दुचाकीसह इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल जास्त आहे. विशेषत युवकांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची जबरदस्त क्रेझ आहे. तर बहुतेकांचा कल पारंपारिक दूचाकी वाहन खरेदी करण्याकडे आहे. अनेक बँकासह वित्तीय संस्थांकडून सहज उपलब्ध होणार्‍या कर्जांमुळे वाहन खरेदीचा जोर वाढला आहे. त्याचबरोबर अनेक नव्या गृहप्रकल्पांचे भूमीपूजन मुहूर्तावर होत आहे. तसेच पूर्ण झालेल्या गृह प्रकल्पांतील घरांच्या चाव्या पाडव्याच्या मुहूर्तावर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सोने-चांदीची बुकिंग

सोने-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांत साततत्याने वाढ होत असली तरी सराफ बाजारत मोठ्या उलाढालीची अपेक्षा आहे. विशेषत मुहूर्तावर सोने नेण्यासाठी अनेक ग्राहकांनी यापुर्वीच सोन्याचे बुकिंग करुन ठेवले आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात तर बुकिंसाठी तर ग्राहंकांची अक्षरश: झुंबड पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीर मोबाईल शॉपी, इलेक्ट्रॉनिक मॉल्स आणि फर्निचरच्या शोरुममध्ये ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. टीव्ही, फ—ीज, वॉशिंगमशीन, मोबाईल, मायक्रोव्हेव, ओव्हन गुढीपाढव्याच्या मुहूर्तावरच घरी नेण्यासाठी अनेक ग्राहकांनी प्रिबुकिंग करुन ठेले आहे.

20 हजार कोटींची उलाढाल अपेक्षित

सोने-चांदी, रिअर इस्टेट, वाहने, इलेक्ट्रॉनिक यासह राज्यात एकूण 20 हजार कोटी रुपयांची उलाढाल पाडव्याच्या मुहूर्तावर अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र चेेंबर्स ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

Back to top button