झेरॉक्सला ‘मास्कड् आधार’चा पर्याय; शासनाचा नवा निर्णय | पुढारी

झेरॉक्सला ‘मास्कड् आधार’चा पर्याय; शासनाचा नवा निर्णय

पुसेसावळी; पुढारी वृत्तसेवा :  आधार कार्डच्या झेरॉक्सचा वापर करून आजअखेर अनेक जणांची फसगत झाली आहे. ही फसगत टाळण्यासाठी आता मास्कड् आधार कार्डचा पर्याय समोर आला आहे. यापुढे मास्कड् आधार कार्डचा वापर करावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. मास्कड् आधार कार्ड म्हणजे ई-आधार कार्ड होय. ज्यामध्ये 12 वर्णांऐवजी केवळ 4 वर्ण दिसतात. आधार कार्ड डेटा लीक झाल्याच्या बातमीनंतर यूआयडीएआयने मास्कड् आधारची संकल्पना सुरू केली आहे. जी नियमितपेक्षा अधिक सुरक्षित आहे. ते मिळवणे खूप सोपे आहे. यूआयडीएआय वेबसाईटवर जाऊन काही आवश्यक माहिती देऊन ते सहज डाऊनलोड केले जाऊ शकते.

मास्कड् आधार कार्ड हा आधार क्रमांक अर्धवट लपवल्याशिवाय सामान्य आधार कार्डासारखाच असतो. आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे चार अंक दिसतात. मास्कड् आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि क्यू.आर.कोड यासारखीच इतर माहिती असते. आधार कार्ड ऑनलाईन अगदी सहज डाउनलोड करु शकता.

आपण यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवरून मास्कड् आधार ऑनलाईन डाउनलोड करू शकता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपला मोबाईल क्रमांक यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नोंदणीकृत असेल तरच आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता. मास्कड् आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे. आधार डाऊनलोड असे करा.
ख हर्रींश विभागात आधार/ व्हीआयडी/ नोंदणी आयडी हा पर्याय निवडा. आता डशश्रशलीं र्ूेीी झीशषशीशपलश पर्यायामधून चरीज्ञशव -रवहररी वर टिक करा. त्यानंतर इतर आवश्यक माहिती एंटर करा आणि ठर्र्शिींशीीं जढझ वर क्लिक करा आणि ख -सीशश वर क्लिक करा. नंतर उेपषळीा वर क्लिक करा. आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक जढझ पाठवला जाईल. आता ओटीपी प्रविष्ट करा, द्रुत सर्वेक्षणासाठी ऊेुपश्रेरव -रवहररी वर क्लिक करा. यानंतर मास्कड् आधार कार्ड डाऊनलोड होईल.

Back to top button