सातार्‍यात मटकाकिंगच्या जुगार अड्ड्यावर छापा | पुढारी

सातार्‍यात मटकाकिंगच्या जुगार अड्ड्यावर छापा

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  मटका बुकी शमीम सलीम शेख ऊर्फ समीर कच्छी या मटकाकिंगच्या सातार्‍यातील घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) धाड टाकून त्याच्यासह 20 जणांची उचलबांगडी केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे 17 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संशयितांमध्ये सातारासह तालुक्यातील जुगार बहाद्दर पंटर आहेत.

शमिम ऊर्फ समीर सलिम शेख ऊर्फ कच्छी, धनंजय संपतराव कदम, अश्विन विनायक माने, नासिर हुसेन दिलावर शेख, सलिम कादिर खान, शकिल कादर सय्यद, विष्णू काशीनाथ सोनटक्के, राजेश संपत कदम, विकास राजू चव्हाण, संतोष रामचंद्र माने, अक्षय जोतिराम सोनावणे, गजानन चंद्रकांत इरकल, किशोर दिलीप साळुंखे, असद वाहिद सय्यद, असिफ बशीर खान, साहिल शमिम ऊर्फ समीर शेख ऊर्फ कच्छी, संतोष मोहन गुरव, प्रकाश तानाजी बोभाटे, श्रीकांत लक्ष्मण पाटील, अमर गणेश पवार (सर्व रा. सातारा शहर व सातारा तालुका परिसर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील शमिम उर्फ समीर सलिम शेख उर्फ कच्छी (रा.मोळाचा ओढा, सातारा) हा प्रमुख बुकी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शमिम उर्फ समीर सलिम शेख उर्फ कच्छी हा संपूर्ण सातारा जिल्ह्यातील मटका व्यावसायिकांचा प्रमुख असून त्याच्या सर्व आर्थिकबाबी त्याच्यानुसार चालत आहेत. संशयित पोलिसांच्या रडारवर होता. रविवारी सर्व संशयित कच्छीच्या घरी जमल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार तात्काळ पथक तयार करुन त्याच्या राहत्या काळेवस्ती, सैदापूर ता. सातारा येथील घरामध्ये छापा टाकला. यावेळी कल्याण, मेन, मिलन, राजधानी, टाईम नावचा जुगार चालवत असल्याचे समोर आले. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिसराला वेढा दिल्याने संशयितांची धरपकड करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्याठिकाणी सुमारे सव्वा लाखाची रोकड, कार, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल होता. पोलिसांनी तो जप्त करुन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर, पोनि विश्वजीत घोडके, सपोनि संतोष पवार, सपोनि रमेश गर्जे, फौजदार विश्वास शिंगाडे, वसंत जाधव, पोलिस उत्तम दबडे, संतोष पवार, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, मंगेश महाडीक, अमोल माने, अजित कर्णे, विशाल पवार, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख, मोना निकम, राधा जगताप यांनी कारवाईत सहभाग घेतला.

संशयितांची जेलमध्ये रवानगी…

मटकाकिंगच्या घरावर धाड पडल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली. पोलिसांच्या धडक कारवाईचे स्वागत करण्यात आले. संशयितांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. याठिकाणी जामिनासाठी युक्तिवाद झाल्यानंतर मात्र न्यायालयाने जामीन नामंजूर करत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांची जेलमध्ये रवानगी केली.

Back to top button