बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याचा विषय पक्षातंर्गत : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याचा विषय पक्षातंर्गत : पृथ्वीराज चव्हाण

कराड; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याबाबत आपणास माहिती नाही. आपणास हे मीडियामधून समजल्याचे सांगत हा पक्षातंर्गत विषय आहे. त्यामुळे या विषयावर आपण काहीही भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्याचवेळी अन्य एका प्रश्नाचे उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, प्रत्येक घडामोडीत भाजपचा हात असतोच. स्वतःच्या ताकदीवर त्यांना काही मिळवता येत नाही. भाजपमधील आमदारांची संख्या पहिली, तर निम्मे लोक काँग्रेसचेच असल्याचे पाहावयास मिळते, असा टोला त्यांनी लगावला.

आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. आपण त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. मात्र, नाशिक पदवीधर निवडणुकीत ज्या घडामोडी घडल्या. त्यामुळे विधिमंडळातील काँग्रेसची एक जागा कमी झाली आहे. ही बाब गंभीर असून हे सर्व टाळता आले असते का? पक्षश्रेष्ठींकडून याची चौकशी सुरू आहे. १५ फेब्रुवारीला कार्यकारिणी बैठक होणार आहे. या बैठकीस प्रभारी एच. के. पाटील हेही उपस्थित असणार आहेत. या बैठकीत सविस्तर चर्चा होईल, असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button