

सातारा; पुढारी वृत्तसेवा : चिमनगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर कारखान्याला मंगळवार 5 ऑक्टोबर रोजी भेट देणार असल्याची ग्वाही भाजपचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी कारखान्याच्या संचालकांच्या भेटी दरम्यान दिली. जरंडेश्वर कारखान्याच्या शिष्टमंडळाने किरीट सोमय्या यांची आज (मंगळवार) सकाळी 7 वाजता भेट घेतली.
जरंडेश्वर कारखान्याची सर्व माहिती देऊन कारखान्याच्या माहितीची फाईल सोमय्या यांच्याकडे सादर केली. त्यावर त्यांनी मंगळवारी दि. 5 रोजी जरंडेश्वर कारखान्याला भेट देणार असल्याची ग्वाही कारखान्याच्या संचालकांना दिली.