सातारा : बेलवडे हद्दीत सहलीच्या बसचा अपघात; तीन विद्यार्थी व तीन शिक्षक जखमी | पुढारी

सातारा : बेलवडे हद्दीत सहलीच्या बसचा अपघात; तीन विद्यार्थी व तीन शिक्षक जखमी

तासवडे टोलनाका : पुढारी वृत्तसेवा पुणे-बंगळूर महामार्गावर बेलवडे हवेली ( ता. कराड) गावच्या हद्दीत हॉटेल राजस्थानी राजपुरोहीत धाब्यासमोर विद्यार्थ्यांच्या सहलीची बस व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन विद्यार्थी आणि तीन शिक्षक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज ( दि. १८ ) सकाळी सातच्‍या सुमारास घडली.

वाघोली ( ता. कोरेगाव जि. सातारा ) येथील  विद्यार्थी बसने सहलीला जात होते.  राजस्थानी हॉटेल समोर अचानक कंटेनर महामार्गावर आल्यामुळे बस कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात तीन विद्यार्थी आणि तीन शिक्षक जखमी झाले आहेत. जखमींवर कराड व सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :  

Back to top button