धारदार शस्त्राने महिलेचा खून | पुढारी

धारदार शस्त्राने महिलेचा खून

कराड ; पुढारी वृत्तसेवा : कराडमधील रुक्मिणीनगर परिसरात धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून केला. घटनेनंतर संशयिताने पोबारा केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. शनिवार, दि. 25 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

उज्वला रघुनाथ ठाणेकर ( सध्या रुक्मिणीनगर, रा. वाखाण रोड, कराड. मूळ रा. पेठ वडगांव जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सचिन बाळू निगडे ( रा. मलकापूर, ता. कराड) याने शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, उज्वला ठाणेकर या पतीसोबत न राहता दोन वर्षापासून कराडमध्ये एकट्याच वास्तव्यस होत्या. तर त्यांच्या बहिणीचे पती सचिन निगडे याचे उज्वलाच्या घरी येणे-जाणे होते. शुक्रवार दि. 24 रोजी. उज्वलाने आपण मैत्रिणीसह कोरोना लस घ्यायला जाणार आहे, असे सचिन निगडे याला फोन करून सांगितले होते.

शनिवारी सकाळच्या सुमारास सचिन उज्वलाच्या घरी गेला. मात्र घराला कुलूप होते. त्यानंतर उज्वला ज्या मैत्रिणीसमवेत लस घ्यायला जाणार होती, त्या मैत्रिणीच्या घरी जाऊन सचिनने विचारपूस केली. त्या मैत्रिणीने आम्ही शुक्रवारी दुपारी तीन वाजता लस घेऊन आपआपल्या घरी गेल्याचे सांगितले.

त्यानंतर सचिन उज्वलाच्या मैत्रिणीला सोबत घेऊन पुन्हा उज्वलाच्या घराकडे आला. त्यांनी उज्वलाच्या घराच्या खिडकीतून आत पाहिले असता उज्वला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

त्यामुळे त्यांनी लोकांच्या मदतीने दगडाने कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यावर उज्वलाचा खून झाल्याची बाब समोर आले. महिलेचा मृतदेह किचनमध्ये पडला होता. तर हॉलमध्ये रक्‍ताचे डाग पडले होते. यावेळी सचिन निगडे यांने पोलीस उपनिरिक्षक अर्जुन चोरगे यांना याबाबतची माहिती दिली. डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा सुरू केला.

Back to top button