Wrestler Khashaba Jadhav : खाशाबा जाधव यांची गुगलने दखल घेतली पण, सरकारने नाही : संभाजीराजे | पुढारी

Wrestler Khashaba Jadhav : खाशाबा जाधव यांची गुगलने दखल घेतली पण, सरकारने नाही : संभाजीराजे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव (Wrestler Khashaba Jadhav) यांची आज जयंती. संभाजीराजें छत्रपती यांनी ट्विट करत खाशाबा जाधव यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी,”गुगलने दखल घेतली पण, सरकारने नाही !मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे ! ” अशी खंतही त्‍यांनी व्यक्त केली आहे.

Khashaba Dadasaheb Jadhav
Khashaba Dadasaheb Jadhav

कुस्ती म्हटलं की, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव ( Khashaba Dadasaheb Jadhav ) यांचे स्‍मरण हाेते. १९५२ मध्ये फिनलॅंड देशातील हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी कुस्ती खेळातील कांस्य पदकावर मोहर उमटवली आणि स्वतंत्र भारताला ऑलिम्पिकमधील पहिलं वैयक्तिक पदक मिळवून दिलं आणि भारताच्या मानात शिरपेच रोवला. 

Wrestler Khashaba Jadhav : गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही !

संभाजीराजें छत्रपती यांनी  ट्विट करत खाशाबा जाधव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. त्याचबरोबर खंतही व्यक्त केली आहे की, गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही ! त्यांनी पुढे काय म्हटलं आहे की, १९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. या निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे ! देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून “पद्म” पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत.

गुगलने पहिले ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव यांना डूडल करत अनोखे अभिवादन केले.

मी खासदार असताना २०१७ ते २०२२ अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर “पद्मविभूषण” मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला, मात्र शेवटी उपेक्षाच झाली. आता तरी सरकारने जागे व्हावे. या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना “पद्म” पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल…

हेही वाचा

 

Back to top button