सातारा, पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर येथे सध्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. मात्र घाट रस्ता आणि अंतर्गत रस्ता अरुंद असल्याने ऐन हंगामात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागले पहावयास मिळाल्या.
या वाहतूक कोंडीला पर्यटकांना आणि स्थानिकांना सामोरे जावे लागत आहे.पर्यटकांच्या वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहनांचा वेग कमी असून पार्किंगच्या कमतरतेमुळे वाहनांची गर्दी होऊन तासंतास ट्राफिक जाम होत आहे. कुटुंबीयांसोबत सुट्टीचे क्षण घालवण्यासाठी आलेल्या पर्यटकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांमधून नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.