ना. शंभूराज देसाई यांच्यावर अवैध बांधकामाचा आरोप | पुढारी

ना. शंभूराज देसाई यांच्यावर अवैध बांधकामाचा आरोप

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यावर अवैध बांधकाम केल्याचा आरोप ठाकरे गटाने मंगळवारी केला आहे. ना. देसाई यांनी महाबळेश्वर तालुक्यातील नावली येथे इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये शेतजमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप करत आ. अनिल परब यांनी त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली.

आ. परब यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शंभूराज देसाई यांची महाबळेश्वरजवळील नावली येथील गट क्रमांक २४ मध्ये जमीन आहे. ही जागा त्यांनी १० वर्षांपूर्वी खरेदी केली असून ७ वर्षांपूर्वी या जागेवर घर बांधले आहे. ही जागा त्यांच्याच नावावर असून निवडणूक शपथपत्रात त्यांनी या जमिनीवर शेतजमीन व घर असा उल्लेख केला आहे. परंतु, ७/१२ उताऱ्यावर घराच्या बांधकामाचा उल्लेख नाही. त्यामुळे हे बांधकाम अवैध आहे. ज्या जमिनीवर अवैध बांधकाम झाले आहे ते इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येते. देसाई यांनी या जागेत कोणत्याही परवानग्या न घेता घराचं अवैध बांधकाम केलं आहे, असा आरोप करत देसाई यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.

Back to top button