सातारा : महाबळेश्वर-पाचगणी पर्यटकांनी हाऊसफुल्ल

सातारा : महाबळेश्वर-पाचगणी पर्यटकांनी हाऊसफुल्ल
Published on
Updated on

महाबळेश्वर/पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये नाताळ सणाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नाताळची सुट्टी झाल्याने दोन्ही पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरून गेली आहेत. दोन्ही शहरांतील चौका-चौकांत आणि हॉटेलमध्ये ख्रिस्ती बांधवांसाठी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे वातावरणाचा माहोल बदलून गेला आहे. गुलाबी थंडीत पर्यटक ख्रिसमसचा आनंद घेत आहेत. दरम्यान, कास-बामणोलीसह इतर पर्यटनस्थळांवरही पर्यटकांची गर्दी झाली आहे.

मेरी ख्रिसमस…! म्हणत नाताळच्या स्वागताला महाबळेश्वर आणि पाचगणी सज्ज झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक व हॉटेलचालकांनी विविध आयडिया करून सजावट केली आहे. ख्रिसमससाठी हजारो पर्यटकांनी दोन्ही शहरांमध्ये आगाऊ बुकिंग करून ठेवली आहेत. कृषी पर्यटन केंद्रेही हाऊसफुल्ल झाली आहेत.

ख्रिश्चन धर्मीयांचा नाताळ हा पवित्र सण असतो. यानिमित्त अनेक हॉटेल्समध्ये नाताळबाबा प्रतिकृती पाहावयास मिळत आहे. यंदाही हॉटेल व्यावसायिकांनी विविध उपक्रम राबविले आहेत. कोरोनानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा होत असल्याने महाबळेश्वर आणि पाचगणीत जल्लोष आणि चैतन्याचे वातावरण आहे. पाचगणीमध्ये विविध पॉईंटवर पर्यटक गर्दी करू लागले आहेत. पाचगणीबरोबर महाबळेश्वरमध्येही पर्यटकांची रेलचेल वाढत आहे. ख्रिसमसनिमित्त बाजारपेठेत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महाबळेश्वर व परिसरातील प्रसिद्ध ऑर्थरसीट, निसर्गरम्य केट्स पॉईंट, लॉडविक, सूर्योदयासाठीचा विल्सन, सूर्यास्तसाठी प्रसिद्ध मुंबई पॉईन्ट या प्रेक्षणीय स्थळांसह माचूतर गणपती मंदिरामागील नयनरम्य प्लेटो पॉईंट, लिंगमाळा धबधबा येथे पर्यटक गर्दी करू लागले आहेत. पाचगणीतील टेबललँड आणि महाबळेश्वरमधील पोलो ग्राऊंडमध्ये घुडसवारीचा आनंद पर्यटक घेत आहेत. ऑनलाईन बुकींगमुळे सर्व हॉटेल्स फुल्ल झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news