सातारा : कुडाळ येथील ढाब्यावर छापा, ७० हजारांची दारु जप्त | पुढारी

सातारा : कुडाळ येथील ढाब्यावर छापा, ७० हजारांची दारु जप्त

पाचगणी (सातारा), पुढारी वृत्तसेवा : जावळी तालुक्यातील कुडाळ येथील अबोली ढाब्यावरील दारू अड्ड्यावर मेढा पोलिसांनी छापा मारला. या छाप्यामध्ये 70,165 रुपयांचा दारूचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच ढाबा मालक दीपक वारागडे (वय 48) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबोली ढाब्यावर अवैद्य दारू विक्री होत असतानाची माहिती पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी सापळा लावून 70,165 रुपयांच्या दारुच्या देशी-विदेशी बाटल्या जप्त केल्या आहेत. दीपक वारागडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जावळीत कोणीही अवैध दारू विक्री करत असल्यास थेट पोलिसांची संपर्क साधावा असे पोलिसांनी आवाहन केले आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

लोणावळा : द्रुतगतीवर विचित्र अपघात; एक ठार, दोन जण जखमी

पुणे : दहा टक्के व्याजाने पैसे उकळणारा सावकार जेरबंद

राज्यात थंडीचा पारा सरासरीच्या ३.३ अंशाने कमी; पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव वाढणार 

Back to top button