सातारा : वनवासमाची येथे उसाच्या शेतात आढळली बिबट्याची तीन पिल्ले | पुढारी

सातारा : वनवासमाची येथे उसाच्या शेतात आढळली बिबट्याची तीन पिल्ले

कराड (सातारा), पुढारी वृत्तसेवा : कराड गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या बाजूस उसाच्या शेतात ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. सोमवार (दि.21) दोन वाजण्याच्या सुमारास ही पिल्‍ले कामगारांना दिसली. शेतकरी प्रशांत तुकाराम यादव यांच्या शेतात बिबट्याची पिल्ले दिसून आली.

स्‍थानिक लोकांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. याबाबतची माहिती मिळालेनंतर काही वेळातच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने वनवासमाची परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे वनअधिका-यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी शिवारात जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button