सातारा : पद झेपत नसेल तर कोश्यारींना बाजूला केलं पाहिजे : खा. उदयनराजे | पुढारी

सातारा : पद झेपत नसेल तर कोश्यारींना बाजूला केलं पाहिजे : खा. उदयनराजे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यांना शिवरायांच्या इतिहासाचे विस्मरण होत असेल किंवा त्यांची बुध्दी भ्रष्ट झाली असेल. राज्यपाल मोठे पद असून त्यांना ते झेपत नसेल त्यांना बाजूला केले पाहिजे, अशी टीका खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांनी शिवरायांचा इतिहास वाचला तर बरे होईल. शिवरायांबाबत विधान करणाऱ्यांची बुध्दी भ्रष्ट झाली असावी किंवा त्यांना विस्मरण होत असावे. तशीच ही विकृतीही असू शकते, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.

Back to top button