सातारा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेची ‘कुस्ती’ न्यायालयात

सातारा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेची ‘कुस्ती’ न्यायालयात

सातारा; विशाल गुजर :  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनावरून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अस्थायी समिती या दोन संघटनांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या दोन्ही गटाचा वाद हायकोर्टात गेला असून बुधवार दि. 9 रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यामध्ये नक्की कोणती संघटना चितपट होणार? याकडे कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

 नवीन सरकार आल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करून अस्थायी समितीची स्थापना केली. या अस्थायी समितीतर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यातच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र केसरी 2022-23 व वरिष्ठ राज्य अजिंक्यपद गादी व माती कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ ग्रीको रोमन, कुमार, महिला व युवा अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याचे प्रसिध्दी पत्रक काढले. या पत्रकामुळे नेमक्या कोणत्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरायचे? अशी विचारणा पैलवानांतून होऊ लागली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट बनले आहे. आतापर्यंत हायकोर्टात 4 सुनावण्या झाल्या असून आज दि. 9 रोजी अंतिम निकाल हाती येणार आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवणारी संघटना ही अधिकृत होेणार आहे. त्यांनाच या स्पर्धेचा मान मिळणार आहे. त्यामुळे सर्व कुस्ती प्रेमींचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news