सातारा : शरद पवारांनी पाणी पळवण्याचे केलेलं पाप आम्ही धुवून काढले : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर | पुढारी

सातारा : शरद पवारांनी पाणी पळवण्याचे केलेलं पाप आम्ही धुवून काढले : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : नीरा देवघर प्रकल्पामध्ये शरद पवार आणि अजित पवारांनी चुकीचा रिपोर्ट सादर करून केलेलं षडयंत्र उघड झालं आहे. हा प्रकल्प २००० साली पूर्ण झाला. रामराजेंना मंत्रिपद देण्याचे अमिष देत या ठिकाणी कॅनॉल करण्यास विरोध केला. केवळ शरद पवारांना लाभ देण्यासाठी ही योजना थांबवण्यात आली. पवारांनी पाणी पळवण्याचे केलेलं पाप आम्ही धुवून काढले, अशी टीका माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली.

खासदार नाईक निंबाळकर यांच्यावतीने फलटण शहरातील २१ हजार कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप आणि ५०० मुस्लिम कुटुंबाना मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार नाईक निंबाळकर यांनी पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, नीरा देवघर प्रकल्पामध्ये शरद पवार आणि अजित पवारांनी चुकीचा रिपोर्ट सादर केला. पंतप्रधान कार्यालयाला खोटी माहिती इरिगेशनने दिली. हे षडयंत्र उघड झाले असून त्यामध्ये सामील असलेल्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button