सातारा : आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते : शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला | पुढारी

सातारा : आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते : शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

सातारा : पुढारी वृत्तसेवा : गोडोली येथील दांडियाच्या कार्यक्रमात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘मैं हूँ डॉन… मैं हूँ डॉन’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला. तसेच त्यांनी यावेळी दांडिया खेळण्याचा आनंदही लुटला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना कॉलर उडवण्याची मागणी केली त्यावर आ. शिवेंद्रराजेंनी आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते, अशी प्रतिक्रिया देत खा. उदयनराजेंना टोला लगावला. गोडोली येथे एका मंडळाने दांडियाचे आयोजन केले आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री आ. शिवेंद्रराजेंची तेथे एन्ट्री झाली. शिवेंद्रराजे तेथे आल्यानंतर तरूणांमध्ये एकच उत्साह संचारला. शिवेंद्रराजे आल्यानंतर ‘मैं हूँ डॉन… मैं हूँ डॉन’ हे गाणे यावेळी वाजवण्यात आले. तरूणांसोबत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्या गाण्यावर ठेका धरला.

त्यांनी भन्नाट डान्स सुरू केल्याने वातावरण प्रफुल्लित झाले. डान्स केल्यानंतर त्यांनी दांडिया खेळण्याचाही आनंद लुटला. दरम्यान, ‘मै हू डॉन’ च्या गाण्यावर खा. उदयनराजेंनी अनेकदा कॉलर उडवली आहे. त्यामुळे तरूणांनी शिवेंद्रराजेंना डान्स करताना कॉलर उडवण्याची विनंती केली. मात्र, शिवेंद्रराजेंनी याला नकार देत आपली कॉलर आपल्या मानेवर चांगली दिसते, असा टोला उदयनराजेंना लगावला.

Back to top button