सातारा : तापोळा पर्यटन बहरले; हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल | पुढारी

सातारा : तापोळा पर्यटन बहरले; हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल

पाचगणी: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळा पर्यटन केंद्र सध्या पर्यटकांनी चांगलेच बहरले आहे. शनिवार, रविवारी सुट्टी असल्याने पाचगणी, महाबळेश्वरसह तापोळा येथे हजारोंच्या संख्येत पर्यटक दाखल झाले आहेत. शिवसागर जलाशयामध्ये बोटिंग क्लबवर पर्यटकांची गर्दी झाली आहे.

पावसाळ्यानंतर या विभागातील पर्यटन मोठ्या प्रमाणात बहरले आहे. येथील शिवसागर जलाशयाचे सौंदर्य व हिरव्यागार गवताच्या गालीचे, पर्वतरांगा पर्यटकांना आकर्षित करत आहेत. डोंगर पठारावर रंगीबेरंगी रानफुले त्याचबरोबर परिसरातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा याचं दिसणारे देखणं सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडत आहेत. दरम्यान, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button