मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी: वर्षासह ठाण्यातील निवासस्थानी सुरक्षा वाढवली | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी: वर्षासह ठाण्यातील निवासस्थानी सुरक्षा वाढवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते.  निनावी फोन करून मुख्यमंत्री शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आणि ठाण्यातील निवासस्थानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तर  धमकीच्या फोननंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

Back to top button