सातारा : आळजापूर पेट्रोल पंपावर कोयत्‍याच्या धाकाने दरोडा; २५ ते ३० हजाराची लूट | पुढारी

सातारा : आळजापूर पेट्रोल पंपावर कोयत्‍याच्या धाकाने दरोडा; २५ ते ३० हजाराची लूट

लोणंद : पुढारी वृतसेवा आळजापूर येथील पेट्रोल पंपावर चौघांनी कोयत्याचा धाक दाखऊन 25 ते 30 हजाराची रोकड लंपास केली. चोरट्यांचा सिनेमा स्टाईल पोलीस व मालकाने पाठलाग केला. यावेळी लोणंद येथे गाडी सोडून चोरटे अंधाराचा फायदा घेत फरार झाले. चोरट्यांचा शोध लोणंद पोलीस घेत आहेत.

आळजापूर येथील भवानी देवी पेट्रोलियम पेट्रोल पंपावर काल (शुक्रवार) रात्री उशीरा पेट्रोल भरण्यासाठी लाल रंगाच्या स्विफ्ट गाडीतून अंदाजे 25 ते 35 वयोगटातील अनोळखी चारजण आले होते. या चौघांनी पेट्रोल पंपावरील कामगार पृथ्वीराज भंडलकर याच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्याच्या जवळील सुमारे 25 ते 30 हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली.

जबरी चोरी करून स्वीप्ट गाडीतून पळून जात असताना पेट्रोल पंपाचे मालक सौरभ दिवाकर निंबाळकर वाठार व लोणंद पोलिसांनी त्यांचा सिनेमा स्टाईलने आदर्का पासून पाठलाग सुरू केला. आदिर्क फाटयावरून चोरटयांनी लोणंदकडे गाडी वळविली. सालपे घाटातून लोणंद असा पाठलाग सुरु असताना स्वीफ्ट गाडीला लोणंद येथील गोटे मळ्याजवळ पोलीसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीला कंटेनरचा डॅश बसला. चोरटे शिरवळ रस्त्याने जाताना त्यांनी जुन्या शिरवळ नाक्याजवळील शेळके – पाटील वस्तीजवळ स्वीप्ट गाडी तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. पोलीसांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत.

या प्रकरणी लोणंद पोलीसात सौरभ निंबाळकर यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास सपोनि विशाल वायकर व पीएसआय गणेश माने करीत आहेत.

हेही वाचा :  

Back to top button