

सातारा; पुढारी वृत्तसेवा : मागील गळीत हंगामात दक्षिण विभागामध्ये सातारा जिल्ह्याने गाळप आणि उत्पादनात आघाडी घेतली आहे. दक्षिण विभागात गाळपात जिल्ह्यातील जरंडेश्वर आणि कृष्णा तर उत्पादनात जरंडेश्वर आणि सह्याद्री साखर कारखान्याने बाजी मारली आहे. तर या यादीमध्ये कोल्हापूरचा एकमेव जवाहर कारखान्याचा समावेश आहे. याचबरोबर अजिंक्यतारा आणि जयवंत शुगर कारखान्याने क्षमतेहून अधिक कारखाना चालवला आहे. तसेच खटाव-माण आणि अजिंक्यतारा कारखान्याचा हंगाम जास्त दिवस चालला आहे.
साखर संघ, मुंबई च्या कार्यालयाने मागील गळीत हंगामाची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखान्याने दक्षिण विभागासह राज्यातही गाळप, उत्पादन आणि साखर उतार्यात बाजी मारली आहे. गतवर्षी जिल्ह्यात 16 कारखान्यांचा उसाचे गळीत केले. यामध्ये सर्व कारखान्यांनी मिळून 99 लाख 60 हजार 956 मेट्रीक टन उसाचे गाळप केले. यातून 1 कोटी 25 लाख 65 हजार 242 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. याचबरोबर या हंगामात दक्षिण विभागात अजिंक्यतारा कारखाना क्षमतेपेक्षा 160.95 टक्के अधिक चालला आहे. तर जयवंत शुगर हा 160.8 टक्के चालला आहे. यंदा जिल्ह्यात अधिक ऊस असल्याने अजिंक्यतारा कारखाना सर्वाधिक 217 तर खटाव-माण कारखाना 192 दिवस चालला आहे.
यंदा बहुतांश साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉलकडेही आपला मोर्चा वळवला होता. त्यामुळेच यंदाच्या हंगामा 60 कोटी लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले. यामुळे मात्र, साखर उतार्यात घट झाली. साखर संघाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा यामुळे 1.21 टक्के रिकव्हरी लॉस झाला आहे.
अजिंक्यतारा 870482 1030010
किसनवीर 18219 14300
लो.बा. देसाई 266488 314850
रयत 536751 660220
सह्याद्री 1337306 1616811
श्रीराम जवाहर 555426 583920
कृष्णा 1338750 1435136
स्वराज 811029 728940
शरयू 1122610 1043500
न्यू फलटण 527468 474340
ग्रीन पावर 646571 617400
जरंडेश्वर 2045384 2315715
खटाव-माण 792900 899900
जयवंत शुगर 766149 828200