केवळ शोभेसाठी मुख्यमंत्रीपदावर कशाला बसायचे? : ना. शंभूराज देसाई

केवळ शोभेसाठी मुख्यमंत्रीपदावर कशाला बसायचे? : ना. शंभूराज देसाई

सातारा, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचाराचे सोनं दसरा मेळाव्यानिमित्त लुटावयाचे आहे. त्यांच्यापाठीमागे सातारा जिल्हा किती ताकदीने उभा आहे. हे दसरा मेळाव्यातून दाखवून द्यायचे आहे. सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री पदाचा फायदा होत नसेल तर केवळ शोभेसाठी मुख्यमंत्रीपदावर कशाला बसायचे? अशी टिका राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

शिवसेना शिंदे गटाच्यावतीने हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्वराज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. अनिल बाबर, संपर्कप्रमुख शरद कणसे, दादा जाधवराव, जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, युवा सेना जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, महिला संघटिका शारदा जाधव, एकनाथ ओंबळे, निलेश मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. देसाई म्हणाले, ज्या सामान्य कार्यकर्त्यामुळे शिवसेना वाढली मात्र सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदाचा काहीही उपयोग होणार नसेल तर ती शोभेची पदे घेवून बसायचे कशाला? असा टोला उध्दव ठाकरे यांना लगावला. ना. देसाई पुढे म्हणाले, आम्ही त्यांना सांगितले मात्र त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आम्ही बाजूला झालो.आम्हाला शिवसेना वाचवायची आहे. तुम्ही कौटुंबिक वारसा जरूर सांगा मात्र प्रत्येक शिवसैनिकांकडे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे. आ. बाबर म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात सर्वत्र शक्ती उभी करून 5 ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणावर दसरा मेळाव्यासाठी उपस्थित रहावे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री काही भेटले नाहीत. मात्र, हे मुख्यमंत्री भेटत असतात प्रश्न सोडवत असतात, असेही ते म्हणाले. यावेळी जयवंत शेलार, शारदा जाधव, पुरूषोत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

जयंतराव मनकवडे आहेत का?

कार्यक्रमानंतर ना. देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना आ. जयंत पाटील यांच्यावर टीका करत आमदारांची मन कळायला जयवंतराव मनकवडे आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून सहकार व शिक्षण क्षेत्रात त्यांचे चांगले काम आहे वित्तमंत्री म्हणून चांगले काम केले आहे. कोणाच्या मनात काय आहे याचे त्यांना नवीन ज्ञान झालेले दिसत असल्याचा टोलाही लगावला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news