सातारा : जबरी चोरीप्रकरणी एकाला अटक

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातार्यातील गोल मारुती मंदिराजवळून दि. 1 ऑगस्ट रोजी पायी चालत निघालेल्या वृध्दाला थांबवून जबरी चोरी करणार्या एकाला शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) अटक केली.
बाबू रामलिंग गवंडी (वय 32, रा. शाहूपुरी, सातारा मूळ रा. विजापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार वृध्द पायी चालत निघाले होते. यावेळी दुचाकीवरुन निघालेल्या संशयिताने वृध्दाचा रस्ता अडवून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली. वर्दळीच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस गेले दीड महिना शोध घेत होते. तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशी केल्यानंतर संशयिताने चोरीची कबुली देत चोरीतील मोबाईल पोलिसांना परत दिला. पोलिसांनी संशयिताला अटक केली असून त्याने आणखी कुठे चोरीचे प्रकार केले आहेत का? याची चौकशी करत आहेत. पोनि संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजीत यादव, पोलिस हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, स्वप्नील कुंभार यांनी कारवाईत सहभाग घेतला.