सातारा : पुढारी वृत्तसेवा; छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज शिवाजीराजे भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. या पार्श्वभूमीवर राजघराण्यावरील प्रेमापोटी साताऱ्यातील सर्व व्यापाऱ्यांनी सर्व बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
शिवाजीराजे यांच्या पार्थिवावर माहुली या ठिकाणी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांनी शिवाजीराजेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अनेक मान्यवर शिवाजीराजे भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी अदालतवाडा या ठिकाणी येत आहेत.
हेही वाचा