

सातारा, पुढारी वृत्तसेवा : आम्ही सातारा पालिकेत भ्रष्टाचार केला आहे, असा त्यांचा आरोप आहे तर त्यांनी समोरा समोर येऊन पुरावे द्यावेत. नाही तर त्यांनी पोवईनाक्यावर समोरसमोर यावे. तेथेही जमत नसेल तर अजिंक्यतारा किल्ल्यावरील कडेलोट पॉईंटवर या. आम्ही भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाले तर माझा कडेलोट करा. नाही तर तुम्ही उडी मारा. पण, यात्रेत पिपाणी वाजविण्यासारखे करू नका, असा सणसणीत टोला खासदार उदयनराजे भोसले (udayanraj bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना लगावला आहे.