लोणंद : सुखेडच्या आशीर्वाद इथेनॉल कंपनीत आग, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी | पुढारी

लोणंद : सुखेडच्या आशीर्वाद इथेनॉल कंपनीत आग, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी

लोणंद : पुढारी वृतसेवा; सुखेड येथील आशीर्वाद इथेनॉल कंपनीत अचानक आग लागली. चार अग्निशामक बंबांना सुमारे अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वित्त हानी मोठी झाली आहे. लोणंद व खंडाळा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास मदत केली.

सुखेड येथे इथेनॉल आणि स्पिरिट तयार करणारी आशीर्वाद इथेनॉल नावाची कंपनी आहे. या कंपनीत आज सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर स्पिरीटने पेट घेतला व त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आगीची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक गणेश माने, पोलिस हवालदार अविनाश नलावडे, बनकर खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक शंकर पांगारे व सहकाऱ्यांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली.

आग विझविण्यासाठी वाई नगर परिषद, एशिएन पेंट, ज्युबिलिएंट निरा, फलटण नगरपरिषद असे चार अग्निशामक बंब होते. सुमारे अडीच ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक बंबांना यश आले. कंपनील रॉ मटेरीयल असलेल्या स्पिरिटच्या बॅरला आग लागली होती. त्यामुळे आग मोठया प्रमाणावर पसरली. आगीत वित हानी किती झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा

Back to top button