सातारा : कस्तुरींनी घेतले साडी ड्रेपिंग व पारंपरिक मेकअपचे धडे; दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे आयोजन | पुढारी

सातारा : कस्तुरींनी घेतले साडी ड्रेपिंग व पारंपरिक मेकअपचे धडे; दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे आयोजन

सातारा; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व ऋतुजा ब्युटीपार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहभागी महिलांनी गौरी सजावट व पारंपरिक मेकअपचे धडे गिरवले.

गणेशोत्सवात गणपतीपाठोपाठ गौरी येतात. घरोघरी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. त्यांची वेगवेगळ्या रुपात पूजा केली जाते.गौरी सजावट स्पर्धाही घेतल्या जातात. या पार्श्‍वभूमीवर दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. ऋतुजा मेक ओव्हर ब्युटी पार्लरच्या मनीषा चावडीमणी यांनी महिलांना साडी नेसण्याचे वेगवेगळे प्रकार तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी तयार होताना करावयाचा पारंपरिक मेकअप याबाबत मार्गदर्शन केले. गौरींना साडी नेसवण्यासाठी महालक्ष्मी साडी, पेशवाई नऊवार, घागरा साडी, साऊथ इंडियन साडी, रुक्मिणी साडी, मस्तानी साडी इ. प्रकार शिकवण्यात आले. तसेच पारंपरिक वेशभूषेत आकर्षता येण्यासाठी आवश्यक काही टिप्सही दिल्या. या कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, कार्यशाळेत सहभागी महिलांनी लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसेही पटकावली.

कस्तुरींसाठी गौरी-गणपती आरास स्पर्धा

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब व अर्जुन ऑईल यांच्या वतीने गौरी गणपती आरास स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागासाठी दि. 3 ते 11 सप्टेंबरपर्यंत मुदत असून यामध्ये घरगुती गौरी-गणपतीचे आरास फोटो तसेच 40 सेकंदाचा व्हिडीओ 8104322958 या व्हॉटस् अ‍ॅप क्रमांकावर पाठवावा. तसेच दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबची नवीन वर्षाची सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. फोटो व व्हिडिओ पाठवताना स्वत:चे नाव, गाव, कस्तुरी क्लब आयकार्ड नंबर असणे बंधनकारक आहे. प्र्रथम क्रमांकास 7 लिटर, व्दितीय क्रमांक 5 लिटर, तृतीय क्रमांकास 3 लिटर अर्जुन ऑईल दिले जाणार आहे. प्रथम तीन विजेत्यांचे फोटो pudharikasturi या फेसबुकपेजवर अपलोड करण्यात येणार आहेत. सभासद नोंदणीसाठी दै.‘पुढारी’ कार्यालयात सकाळी 11 ते सायं. 6.30 या वेळेत 8104322958 या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button