सातारा : महिलांसाठी गौरी सजावट, पारंपरिक मेकअप कार्यशाळा | पुढारी

सातारा : महिलांसाठी गौरी सजावट, पारंपरिक मेकअप कार्यशाळा

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवार, दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 1 ते 4 या वेळेत प्रतापसिंह हॉल, गुरुवार पेठ येथे महिलांसाठी गौरी सजावट व पारंपरिक मेकअप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात गणपतीपाठोपाठ गौरी येतात. घरोघरी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. त्यांची वेगवेगळ्या रुपात पूजा केली जाते. त्यासाठी आवश्यक टीप्स या कार्यशाळेत दिल्या जाणार आहेत.ही कार्यशाळा ऋतुजा मेक ओव्हर ब्युटी पार्लर यांच्या सहकार्याने होणार असून मनीषा चावडीमणी गौरींना वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार तसेच हळदी-कुंकू कार्यक्रमांसाठी तयार होताना करावयाचा पारंपरिक मेकअप याबाबत प्रशिक्षण देणार आहेत.

ही कार्यशाळा कस्तुरी सभासदांसाठी मोफत असून इतर महिला व युवतींसाठी प्रत्येकी 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सहभागासाठी इच्छुकांनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 8104322958 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.

कस्तुरी क्‍लब सभासद नोंदणीला सुरुवात

दै.‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या सभासद नोंदणीला दणक्यात सुरूवात झाली असून, जिल्हाभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सभासद होणार्‍या महिलांना आकर्षक भेटवस्तू मिळणार असून वर्षभर बक्षिसांचा वर्षावही होणार आहे. त्यामुळे सभासद नोंदणीसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. सभासद नोंदणीसाठी दै.‘पुढारी’ कार्यालयात स. 11 ते रात्री 6.30 यावेळेत 8104322958 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button