सातारा : वीर धरणामधून क्षमतेपेक्षा तिप्पट विसर्ग | पुढारी

सातारा : वीर धरणामधून क्षमतेपेक्षा तिप्पट विसर्ग

लोणंद; पुढारी वृत्तसेवा : खंडाळा तालुक्यासह फलटण तालुक्यासाठी फायदेशीर असणार्‍या वीर धरण यंदा ओव्हर फ्लो झाले. पावसाळा सुरू झाल्यानंतर दोन वेळा विसर्ग करण्यात आला आहे. नीरा खोर्‍यात चांगला पाऊस झाल्याने वीर पातळी पहिल्यापासूनच समाधानकारक राहिली. वीर धरणातून यंदा क्षमतेच्या तिप्पट पाणी वाहून गेले आहे.

वीर धरणाची क्षमता आहे 9.170 टीएमसी आहे. जुलै व ऑगस्टमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहे. वीर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस नसतो. परंतु, नीरा खोर्‍यातील भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी धरणातून सोडलेल्या पाण्याने वीर धरण भरले जाते. यंदा नीरा खोर्‍यातच चांगला पाऊस झाल्याने वीर धरणातही चांगला पाणीसाठा झाला. दोन महिन्यांच्या कालावधीत दोन वेळा मोठ्या प्रमाणात धरणातून विसर्ग करण्यात आला आहे.

धरणाची क्षमता 9 टीएमसी असली तरी धरणातून प्रत्यक्षात 25.699 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे फलटण व बारामतीला अतिरिक्त पाणी मिळाले आहे. सध्याच्या घडीला वीर धरण 97.46 टक्के भरले आहे. भाटघर आणि नीरा देवघर धरणे 100 टक्के भरली असून गुंजवणी धरण 98.76 टक्के भरले आहे. खंडाळा तालुक्यातील वीर धरण 97.46 टक्के , भाटघर धरण 100 % भरले आहे. नीरा-देवघर धरण 100% भरले आहे. गुंजवणी धरण 98.76 % भरले आहे. वीर धरणातून 5 हजार 287, भाटघरमधून 2 हजार 314, नीरा देवघरमधून 700 आणि गुंजवणीमधून 1 हजार 17 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

Back to top button