कोयना धरणातून प्रतिसेकंद 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू

नदीकाठी धोका वाढला
Kolhapur Rain Update
कोयना धरणातून प्रतिसेकंद 30 हजार क्युसेक विसर्ग सुरूPudhari Dam
Published on
Updated on

कराड : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणातून शुक्रवारी (दि.२६) सकाळी 7 वाजता विसर्ग वाढविण्यात आला आहे. प्रतिसेंकद 30 हजार क्युसेक पाणी कोयना नदीत सोडण्यास सुरुवात करण्यात आले आहे. सकाळी ८ वा. धरणामध्ये एकूण ८१.१९ टीएमसी ७७.१४ % पाणीसाठा झाला आहे.

नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दुपारी १२ वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ४२१०० क्युसेक्स असेल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news